महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची खासदार भास्कर भगरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे मागणी

दिंडोरी l मनोज पाटील- खासदार भास्कर भगरे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची शेतकऱ्यांचे बांधावर जात पाहणी केली असून कांदा सह सर्व नुकसान झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
खासदार भास्कर भगरे यांनी पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. यानंतर नाशिक दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन दिले. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात व दिंडोरी लोकसभा मतदार संघात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांचे कांदा, टोमॅटो, आंबा, कोबी, फ्लॉवर, कोथिंबीर, व इतर भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे व खंळयांवर साठविण्याकरिता आणलेल्या कांदा व इतर शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत, तसेच विजेचे खांब कोसळले आहेत त्याचप्रमाणे घरांचे व गोदामांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. तरी त्वरित नुकसानग्रस्त भागातील पिकांचे व इतर सर्व नुकसानीचे पंचनामे करुन आर्थिक मदत मिळणेकामी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने