सुरगाणा l प्रतिनिधी - सुरगाणा तालुक्यातील मालगव्हाण गावात शनिवारी रात्री साडेअकरा वाजता पोलिसांनी कारवाई करत ५०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. यांची किंमत १० हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी लहानू गंगाराम चव्हाण (५५) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि.१८) रोजी आरोपीस नाशिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सुरगाणा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लहानू गंगाराम चव्हाण यांच्या राहत्या घरावर छापा टाकला. छाप्यात ५०० ग्रॅम गांजा आढळून आला, तो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कारवाईत चव्हाण याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी नाशिक येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई दिलीप वाघ, संदीप पगारे, कैलास मानकर, जगदीश घुटे, रमेश चव्हाण, पंडित खिरकाडे यांनी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे करीत आहे.