अलंगुण l कृष्णा पवार :-दि. 7 जून 2026 रोजी संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना , महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने 21 वाँ संकल्प वर्धापन दिन सोहळा केम डोंगराच्या पायथ्याशी व नार नदीच्या जवळ असलेल्या निसर्गरम्य अशा 'पवार फार्महाऊस घोडी' ता.सुरगाणा जि.नाशिक येथे मोठ्या उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संकल्पच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडून आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना अभिवादन करून प्रतिमा पुजनाने सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकल्प आदियुवा जागृती संघटनेचे धुळे जिल्हा सचिव ताराचंद गांगुर्डे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकल्प आदियुवाचे अध्यक्ष चेतन खंबाईत यांनी केले .
वर्धापन दिन कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून उपस्थित सर्व सदस्यांनी आपला परिचय करून दिला. सभेसाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून संकल्पचे पदाधिकारी कांतीलाल नाठे, डाँ.राहुल गावित, मनोहर खंबाईत, अनिल बोरसे, विजय अहिरे, धर्मराज महाले, धनंजय भोये, अनिल जाधव, कुंदन गांगुर्डे, अशोक भोये यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यामध्ये चर्चा करताना संकल्प आदियुवा संघटनेची स्थापना ते आतापर्यंतचा 20 वर्षाचा प्रवास कसा झाला, सुरुवातीला शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रम *स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे, संकल्प टॅलेन्ट सर्च परीक्षा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, करिअर गाइड शिबीर , शैक्षणिक साहित्य वाटप* आदी घेतले गेले. नंतर सांस्कृतिक, क्रीडा, साहित्य , सामाजिक क्षेत्रात प्रसार वाढवत 4 जिल्ह्यातील विस्तार पुढे जाऊन राज्यस्तरीय उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आज संकल्प आदियुवा टीमने नाव लौकिक मिळविले आहे. अनेक अडचणी आल्या तरी ही नडगमगता संकल्पचे पाऊल पुढे जात आहे. याचे संपूर्ण श्रेय संकल्पाच्या जुन्या व नवीन सदस्यांना जात आहे.
या कार्यक्रमासाठी संकल्प आदियुवाचे पेठ, सुरगाणा, साक्री, त्र्यंबकेश्वर, कळवण तालुक्यातील पदाधिकारी विनीत सूर्यवंशी, पंकज देशमुख, दयाल बहिरम, संदीप गांगुर्डे, अजय पवार, राकेश गांगुडे, राजेंद्र गांगोडे, कांतीलाल मोरे, राजू जाधव , मनोज गांगोडे , दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परसराम पाडवी सरांनी केले तर या कार्यक्रमाचे आयोजन संकल्प आदियुवा टीम सुरगाणा तालुक्यातील पदाधिकारी गणेश वाघमारे, भागवत पवार, हेमंत मोरे, धर्मराज महाले, अशोक भोये,सुनील गोतुर्णे, सुनील जाधव, मिथुन चौधरी, कैलास चौधरी, देविदास भरसट, योगेश मोरे यांनी यशस्वीरित्या पार पाडले.