महाराष्ट्र ट्रायबल न्युज

जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जनजागृती उपक्रम उत्साहात

नाशिक l प्रतिनिधी : आडगाव, नाशिक व लासलगाव वाळकेवाडी परिसरात जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त दि. ७ जून २०२५ रोजी अन्न सुरक्षा व आरोग्य विषयक जनजागृती अभियान उत्साहात राबविण्यात आले. हा उपक्रम आयडीयाझम सामाजिक संस्था, नाशिक व त्यागमूर्ती फाउंडेशन, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
     या उपक्रमाचे आयोजन नारायण गभाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अन्न तंत्रज्ञान अभ्यासक संकेत धेनक व आकाश वाळके यांनी नाशिक व लासलगाव परिसरातील विविध ठिकाणी भेट देऊन नागरिक, महिला मंडळे आणि विद्यार्थ्यांमध्ये अन्न सुरक्षा, पोषण व आरोग्य विषयक सखोल जनजागृती केली.
मार्गदर्शन करताना त्यांनी “सुरक्षित अन्न हा निरोगी जीवनाचा पाया आहे” हा संदेश देत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच संतुलित आहार, पोषणमूल्ययुक्त अन्न सेवन आणि सुरक्षित अन्न पद्धती यांचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी माहिती देण्यात आली.
यावेळी शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याच्या संतुलनासाठी “लांबी, रुंदी आणि खोली” या तीन सूत्रांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सुदृढ आरोग्य, पौष्टिक आहार व व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास शालेय विद्यार्थी तसेच हरिदास कांबळे , रतन शिंदे, दिलीप शिंदे, देवपाल शिंदे, सुनीता शिंदे, नंदाबाई सोळुंके, गोरक्षनाथ भाऊ सावरा, तुळशीराम बेंडकुळे, वनिता कडाळी, दीपनाथ जाधव आणि संदीप कडाली आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात अन्न सुरक्षा, पोषण आणि निरोगी जीवनशैलीबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने