माणी - प्रतिनिधी
सुरगाणा तालुक्यातील केम डोंगराच्या पायथ्याशी सुळ्याचा घाट, रोकडपाडा येथे दोन बिबट्यांनी पाच शेळ्यांचा फडशा पाडला असून ही घटना सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. पशुपालक जयराम खांडवी हा केम डोंगराच्या पायथ्याशी सुळ्याचीबारी येथे शेतात गुरे व बकऱ्या चारत असताना अचानक दोन बिबटे घुसल्याने काही क्षणात एकापाठोपाठ एक पाच बकऱ्या जागेवरच ठार केल्या. गुराख्यांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर बिबटे जंगलात पसार झाले. रोकडपाडा येथे घडलेल्या या घटनेत रतन भिका खांडवी यांची एक, पुंडलिक यशवंत बंगाळ एक तर जयराम भिका खांडवी यांच्या तीन अशा ५ बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडला.