दिंडोरी । मनोज पाटील दि.28:-जम्मु काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ सर्व पक्षीय व नागरिकांच्या वतीने दिंडोरी चौफुलीवर रास्ता रोको करत तीव्र निषेध व्यक्त केला.
सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी हल्ल्यातील मृत पर्यटकांना मौन पाळत श्रद्धांजली अर्पण केली. ग्रामस्थांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे व मृतांना श्रध्दांजली अर्पण करणारे फलक तसेच तिरंगा हाती घेत दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. दहशतवादी संघटना, त्यांचे पोशिंदे यांच्या विरुध्द घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. दहशतवाद्यांचा नायनाट केल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी सतिश देशमुख, नगरसेवक नितीन गांगुर्डे, हेमंत पगारे, रणजित देशमुख, शाम मुरकूटे, उज्वला उगले, संतोष मुरकूटे, अमर राजे, मनोज ढिकले, अमोल उगले, प्रशांत मोगल, नीलेश शिंदे, मित्रानंद जाधव, आप्पा वटाणे, छबु मटाले, सागर पगारे, पंकज देशमुख, प्रवीण देशमुख सलीम मिर्झा, सागर पवार, विकी मवाळ, शांताराम जाधव आदींसह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.