महाराष्ट्र ट्रायबल न्युज

हतगड परिसरात वाहतूक नियमांचे प्रबोधन; नागरिकांना नियमावलीची माहिती

बोरगाव l  प्रतिनिधी
दि. 26 जून 2025 रोजी दुपारी 2.10 वा. सुमारास सापुतारा रोडवरील हातगड पर्यटनस्थळाच्या मार्गावर पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. माळोदे व त्यांच्या पिंपळगाव पोलीस केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांसाठी वाहतूक नियमांचे प्रबोधन केले. या उपक्रमात सुमारे 18 ते 20 कार चालक, मोटारसायकलस्वार यांची उपस्थिती होती.
     या प्रबोधनात नागरिकांना खालील महत्त्वाच्या वाहतूक नियमांबाबत माहिती देण्यात आली:

१.विनापरवाना कोणतेही वाहन चालवू नये.

२.मोटारसायकल चालविताना चालक व मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालणे बंधनकारक.

३.वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा.

४.गाडीची सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत.

५.मोटारसायकलवर ट्रिपल सीट प्रवास करू नये.

६.मद्यप्राशन करून वाहन चालवू नये.

७.वेगमर्यादा आणि वाहतूक चिन्हांचे पालन करावे.

८.वाहन चालवताना सिट बेल्टचा वापर आवश्यक.

९.ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने व लेन नंबर दोनचा वापर करावा.

१०.नियम मोडल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईची माहिती.

११.महामार्ग व रस्ते ओलांडताना सुरक्षिततेचे भान राखणे व सिग्नलचे पालन करणे.

१२.अपघात झाल्यास तातडीने मदत करावी.

   या वेळी नागरिकांना वाहतूक सुरक्षेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यांनी आपल्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींनाही हे नियम सांगावेत असे आवाहन करण्यात आले.
  या उपक्रमामुळे वाहनचालकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण झाली असून स्थानिक नागरिकांनी याचे स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने