त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी:- उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर नाशिक, येथे 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये मुखकर्करोग, गर्भाशय कर्करोग व स्तनांचा कर्करोग यांची तज्ज्ञच्या मदतीने मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सदर शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.
सदर शिबीर हे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी सर, डॉ राहुल हडपे, डॉ.वैभव बच्छाव,डॉ शिल्पा बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रमेश पवार, डॉ सानिल पाटील, डॉ मनोज पाटील, समुपदेशक अनिल फापळे, आधीपरिचारक किरण जाधव व जयश्री पाटील यांचे सहकार्य व परिश्रमातून शिबीर यशस्वी करण्यात येईल