त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी :- ग्रामसभा काकडपाणा अंतर्गत रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.व हा रानभाज्या महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला...
आदिवासी कला वाद्यांच्या तालावर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मा.श्री.हरिदास काठकरी तारपकर काकडपाणा यांनी केले.
ह्या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.बाळु मनोहर वळवी यांनी केले.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.निलेश भाऊ मोहंडुळे होते व प्रमुख पाहुणे म्हणून वनरक्षक हरसुल चे मा.श्री.हर्षद गावित साहेब आणि मा.श्री.प्रकाश चौधरी साहेब तसेच वयम् चळवळीचे अध्यक्ष विनायक थाळकर साहेब व मा.श्री.लहुदास भाऊ बरफ आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य त्र्यंबकेश्वर तालुका युवा अध्यक्ष आणि श्री.नामदेव टोकरे, श्री.गुलाब बाबा काकडपाणा, श्री.सुरेश बाबा बेहेडमाळ,श्री.स्वामी सर ,श्री.दिनेश पाटील गोलदरी,श्री.सुनिल खुताडे बेहेडमाळ,श्री.भगवान बुधर ग्रामपंचायत सदस्य,डाॅ.गुलाब चौधरी,दळवी सर,मा.श्री.विराज गांगडे सर,मा.श्री.पंढरीनाथ गावित सर, मनोज भसरे, मोहन भसरे, युवराज दोडके, सखाराम बुधर, जयराम बरफ,दादा बुधर, लक्ष्मण बुधर, हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून रानभाज्या महोत्सव कार्यक्रमाला लाभले.
गावकरी:- कैलास नडगे, नामदेव वाढु, काळुदास वाढु, सुरेंद्र बुधर, भगवान मोहंडुळे,बाळु बरफ, वसंत काठकरी, वसंत बुधर, देविदास वाढु, सुरेश बरफ, हरिदास जोधाड, मोहन बुधर, पोपट बुधर, दशरथ बरफ, किसन बरफ, पांडुरंग वाढु, मधुकर वाढु, आनंदा बुधर,सांवजी बुधर, हिरामण वाढु, आत्माराम नगडे,पांडु बुधर, कृष्णा मोहंडुळे, एकनाथ वाढु,विष्णु वाढु, भास्कर बुधर, मोहन वळवी, संदिप जोधाड,दत्तु कुवर,पिंटु भोंबे, रविंद्र दोडके, संजय बुधर, तुषार बुधर, दिलीप भसरे, दिपक दोडके, सुनील टबाले,रतन बुधर, कैलास बुधर, सुनिता बुधर, सुशिला बुधर, संगिता वाढु,सुलाबाई बरफ,मिराबाई नडगे,पिंटीबाई बुधर,आहिल्याबाई मोहंडुळे,बत्तीबाई मोहंडुळे,भागिबाई बुधर,सिताबाई बुधर,काळीबाई वाढु,व तसेच इतर आया बहिणी व भाऊ दादा आणि जेष्ठ नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाची शोभा वाढवावी म्हणून सर्व गावकरी मोठ्या आनंदाने व उत्साहाने आपल्या ग्रामसभा काकडपाणा अंतर्गत रानभाज्या महोत्सवात अधिक प्रमाणात सहभागी झाले व प्रत्येकाने आपापल्या घरी रानभाज्या आणुन भाजुन तयार करून कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टाॅल लावण्यात आले होते. ह्या कार्यक्रमात वेगवेगळ्या ५० पेक्षा अधिक रानभाज्याचे स्टाॅल लावण्यात आले होते.आणि रानभाज्यांची ओळख व फायदे आणि चविला कशा प्रकारे रानभाज्या आहेत.हे सर्व ह्या ग्रामसभा काकडपाणा अंतर्गत रानभाज्या महोत्सवात लोकांना समजुन सांगितलं आहे सविस्तर माहिती स्टाॅल वाल्यांनी सर्वांनी दिली आहे.
म्हणून आपल्याला निसर्गाने दिलेल्या रानभाज्या खाव्यात आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात.व आरोग्य दायी आहेत.हा रानभाज्या महोत्सव ग्रामसभा काकडपाणा या कार्यक्रमातुन जनतेला एक महत्त्वाचा संदेश मिळाला...
कार्यक्रमाचे आभार:- मा.श्री.रमेश साबळे सर जिल्हा परिषद शाळा काकडपाणी मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले.