महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आश्रमशाळा शिरसगाव येथील कु.सानिका चौधरी या खेळाडू विद्यार्थीनीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

त्र्यंबकेश्वर l प्रतिनिधी :- दि.२० आॕगस्ट २०२५ वार बुधवार रोजी डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स असोसिएशन नाशिक यांच्या वतीने मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी, नासिक येथे आयोजित जिल्हा ज्युनियर अंडर २३ चॅम्पियनशिप २०२५ या मैदानी क्रीडा स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा शिरसगाव ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथील कु. सानिका पंढरीनाथ चौधरी या खेडाळु विद्यार्थीनीने १००० मी. धावणे या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवत २ सप्टेंबर २०२५ ते ५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.     
     या खेळाडू विद्यार्थींनींला क्रिडा मार्गदर्शक सिद्धार्थ भोगले, संघ व्यवस्थापक हिरामण टोपले, यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
     वरील खेडाळु विद्यार्थ्यांनीचे तसेच मार्गदर्शकाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नामदेव भांगरे, शाळेचे मुख्याध्यापक दिपक भास्कर,अधिक्षिका पुणम बावणे,अधिक्षक अरुण बागले, माध्यमिक शिक्षिका सिता भोये, माध्यमिक शिक्षक अमोल कामडी, प‌.प्रा.शिक्षक संदिप रुपनर, प्रा. शिक्षक मधुकर लहारे, प्रा.शिक्षिका शोभा जाधव, प्रा.शिक्षक अमोल कोपरेकर, योगेश्वर चव्हाण, मनोहर लहारे, पवन महाले, तसेच शिक्षेत्तर कर्मचारी अनुसया गायकवाड,आरती वाघमारे, किसन टबाले, राहुल वार्डे, हेमराज धुम, हेमंत महाले, लिला महाले, पुंडलिक सहारे,उषा गावित व शाळा व्य. समिती अध्यक्ष अरुण महाले व सदस्य, पालक, तसेच सरपंच भागिरथी महाले, उपसरपंच भगवान महाले यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने