महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अपघातात महिला ठार

वणी l प्रतिनिधी :- सापूतारा रस्त्यावर अंबानेर फाट्याजवळ दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने महिला जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.
     घटना अशी की, पिपंरखेड ता. दिंडोरी येथील आश्रमशाळे इयत्ता पहिलीत असलेल्या मुलाना भेटण्यासाठी वडपाडा, ता. सुरगाणा येथील मनोज लक्ष्मण देशमुख, वय २९ व माधुरी मनोज देशमुख, वय.२५ हे मोटरसायकलवर आले होते. ते शाळेत मुलाला भेटुन वणी येथे कृषी औषधे घेण्यासाठी येत असतांना अंबानेर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीस पाठीमागुन आलेल्या दुचाकीने धडक दिली. यात पुढील मोटरसायकलवरील पाठीमागे बसलेली माधुरी देशमुख ह्या मोटरसायकलवरुन उडून डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर दुचाकीचालक मनोज देशमुख मोटरसायकलसह पुढे आठ ते दहा फुट घसरत गेले. यात त्यांना किरकोळ दुखापत झाली. पाठीमागूून धडक देणारे मोटरसायकल चालक नारायण काशिनाथ रक्ते वय ४०, रा. नाशिक हे पांडाणे आश्रमशाळेत शिपाई असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने