महाराष्ट्र ट्रायबल न्युज

“माझी शाळा माझा अभिमान” – बोरगाव येथे उद्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

बोरगाव l प्रतिनिधी - “माझी शाळा माझा अभिमान” या भावपूर्ण संकल्पनेतून बोरगाव येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, बोरगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा स्नेहमेळावा दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता शाळा परिसरात होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांना सस्नेह निमंत्रण देण्यात आले असून, बालपणीच्या शाळेतील आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवर्गाने केले आहे.
    शाळेच्या स्मृतींना उजाळा देत मुख्याध्यापक म्हणाले की, “शाळेच्या अंगणात बागडणाऱ्या प्रत्येक चिमुकल्याचा आज समाजात उंच भरारी घेतलेला पाहून शाळेला अभिमान वाटतो. त्या सर्वांनी पुन्हा एकदा या अंगणात भेटावे, हीच शाळेची इच्छा आहे.”
या कार्यक्रमाचे आयोजन जि. प. आदर्श प्राथमिक शाळा बोरगाव यांच्या वतीने करण्यात आले असून, मा. ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य व कर्मचारी वर्ग, ग्रुपग्रामपंचायत बोरगाव हे निमंत्रक म्हणून सहभागी आहेत.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने