महाराष्ट्र ट्रायबल न्युज

25 मार्च रोजी पाहूचीबारी येथे नवीन भव्य मारुती मंदिर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा

बा-हे l नामदेव पाडवी :- पेठ तालुक्यातील पाहूचीबारी येथे प.पू. मंदाकिनी महाराज यांच्या कृपेने व प.पू. पिठाधिश्वर महामंडलेश्वर विद्यावाचस्पती स्वामी रमणगिरी गुरु मौनगिरी महाराज यांच्या शुभहस्ते नवीन भव्य मारुती मंदिर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहण सोहळा दिनांक 25 मार्च २०२६ वार - बुधवार रोजी सकाळी 07:30 वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे.
        नवीन मंदिरामध्ये मारुती, भगवान शंकर ज्योतिर्लिंग, गणपती, नंदी मुर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दोन दिवस प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा व दिनांक २६ मार्च २०२६ ते ०२ एप्रिल २०२६ रोजी पर्यंत हनुमान जन्मोत्सव निमित्ताने समस्त गावकरी मंडळी व मारूती मंदिर जीर्णोद्धार समिती पाहूचीबारी यांच्या वतीने व मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ मार्च २०२६ रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, नवीन हनुमान मुर्तीची गावात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प.पू. पिठाधिश्वर महामंडलेश्वर विद्यावाचस्पती स्वामी रमणगिरी गुरु मौनगिरी महाराज, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, दिंडोरी लोकसभा खासदार भास्कर भगरे सर, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार जे.पी गावीत, माजी आमदार धनराज महाले, भाजपा नाशिक दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष सुनिल बच्छाव, आदिम आखाडा राष्ट्रीय उपाध्यक्ष रामदास वाघेरे यांच्यासह साधू - महंत, आजी माजी सभापती, जि.प. सदस्य, विविध सामाजिक संस्था, आदीम आखाडा, जनजाती कल्याण आश्रम पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
     या साडेसात दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहात नामवंत किर्तनकार, गायनाचार्य उपस्थित राहणार आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी व मारूती मंदिर जीर्णोद्धार समिती पाहूचीबारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने