महाराष्ट्र ट्रायबल न्युज

तापमानात दिवसेंदिवस वाढ रसवंतीगृहांना अच्छे दिन

 दिंडोरी । मुख्य संपादक- मनोज पाटील
 गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अचानक तापमानात मोठी वाढ झाली असून नागरीक थंड शीतपेय व रसवंतीगृहाकडे वळु लागल्याने शीतपेये विक्री करणारे आणि रसवंतीगृह वाल्याना थोड्याफार प्रमाणात अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणार्‍या मातीच्या माठांना लिंबू शरबत गाडी, ज्यूस गाडी, घरगुती अशी ग्राहकांची मागणी आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झपाट्याने कमी होत असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा व तहान भागविण्यासाठी थंड पाणी, थंड पेये, उसाचा रस, मठ्ठा, ताक, लस्सी, सरबत, ज्यूस, आईस्क्रीम, रसवंती, बर्फगोळा, कुल्फी, फळे, फळांच्या फोडी, सलाड, भेळपुरी, पाणीपुरी, शेंगदाणे, चाट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची दुकाने थाटली आहेत. त्याचप्रमाणे आईस्क्रीम सुध्दा झाले उपलब्ध आहे. लहान मुलांना फळांचे व चॉकलेटचे आईस्क्रीम पसंत असल्यामुळे संध्याकाळच्या सुमारास नागरिक परिवारासोबत जाऊन आईस्क्रीमचा आनंद घेताना दिसून येत आहेत. सध्या बाजारात नवनवीन मातीचे माठ दाखल झाले असून, यावर तोटीसह नक्षीही करण्यात आली आहे. बाजारात आता 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत माठ बाजारपेठेत उपलब्ध आहेत. कमी किमतीमध्ये फ्रीजप्रमाणे उन्हाळ्यात नैसर्गिक पाण्याची तहान भागवली जाते. या जमान्यातही मातीच्या माठाला वेगळे महत्त्व आहे. माठामध्ये देखील बदल करून त्यास तोटी, झाकण हे वेगळे बनवून ग्राहकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. त्याचप्रमाणे सध्या बाजारात 100 ते 110 रुपये किलोने लिंबु मिळत आहे. किरकोळ बाजारात तर 120 ते 130 रुपये दराने मिळत आहे. त्याचप्रमाणे गॉगल, स्कार्फ, उपरणे, टोपी आदी वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली जात आहे. उन्हाचा कडाका वाढताच शेतकरी वर्ग सकाळी लवकर शेतीचे कामे आटोपून घेतात. दुपारी आराम करुन ऊन कमी झाल्यावर पुन्हा शेती कामे करतांना दिसत आहे. त्याचप्रमाणे दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पहावयास मिळत आहे. सध्या सतत वीज पुरवठा खंडीत होत असल्याने घरातील फी्रज, पंखे, कुलर हे वस्तू शोभेच्या वस्तू बनल्या आहे. शेतीपिकांनाही उन्हाची झळ लागत असल्याने जादा पाणी देण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने