संपादक l कृष्णा पवार
ननाशी |-येथे 20मार्च ते 27मार्च या दरम्यान अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत येथे काकडा भजन,ज्ञानेश्वरी पारायण,ज्ञानेश्वरी प्रवचन,हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.तसेच दररोज रात्री 9 ते 11 या वेळेत ह.भ.प.उमाकांत महाराज शिंदे,ह.भ.प.अक्षय महाराज पवार,ह.भ.प.माणिक महाराज राऊत,ह.भ.प.संजय महाराज शिंदे,ह.भ.प.अश्विनीताई म्हात्रे,ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख,ह.भ.प.गणेश महाराज शिंदे आदी ख्यातनाम कीर्तनकारांचे समाज प्रबोधनपर हरीकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच अखेरच्या दिवशी सकाळी 9 ते 11या वेळेत ह.भ.प.गणेश महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन होऊन भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात येणार आहे.तरी या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील नागरिक आणि भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.