महाराष्ट्र ट्रायबल न्युज

हरसूलला शिवजयंती मिरवणूक

हरसूल : येथील राजमुद्रा फ्रेंड सर्कल हरसूल विभागाच्या वतीने नाशिक - हरसूल महामार्गावरील दलपतपूर फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पारंपरिक वाद्याच्या सवाद्य मिरवणूकीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी टाळ मृदूंग, गायन - भजन तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकासह वेषभुषा केलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रथमतः राजमुद्रा फ्रेंड सर्कल हरसूल विभागाचे संस्थापक प्रमोद कोथमीरे व शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष रवींद्र भोये यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची सप्तनिक पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.हरसूल शहरातून पारंपरिक संवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी टाळ मृदूंगाच्या तालावर अनेकांनी ठेका धरला होता.यावेळी हरसूल ग्रामपंचायत सरपंच काशिनाथ वळवी, राकेश सोनवणे,रवींद्र गवळी,विलास भसरे,विष्णू वाघेरे,विठ्ठल भोये,पपु चोधरी, भगवान बोरसे यांच्यासह हरसूल परिसरातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र : हरसूल : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करतांना पदाधिकारी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने