सुरगाणा तालुक्यातील निंबारपाडा येथील एमसीए ग्राउंड वर आयोजित करण्यात आली होती. यात १२ संघानी सहभाग घेतला होता. जामुनपाडा येथील माळघरे किंग संघाने सुरगाणा प्लास्टिक प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावत रोख रक्कम व ट्रॉफी आपल्या नावे केली.
निंबारपाडा येथे आयोजित सुरगाणा प्लास्टिक प्रिमिअर लीगमध्ये तालुक्यातील १२ संघाने सहभाग नोंदवला. स्पर्धेत उपविजेतेपदाचा मान राशा येथील पवार किंग संघाने मिळवत रोख रुपयांचे बक्षीस पटकावले. स्पर्धेत कुकुडणे येथील नारायण इलेव्हनने रोख रुपयाचे बक्षीस देण्यात आले. शंकर भोये, जयंतीलाल ठाकरे, विष्णू वळवी, योगेश महाले यांच्या हस्ते ट्रॉफी व रोख रक्कम देण्यात आली.
लीग यशस्वी होण्यासाठी चंदू वार्डे साधू राम गावित, सुरगाणा व निंबारपाडा येथील क्रिकेट प्रेमींनी मोलाचे सहकार्य केले.
--
उत्कृष्ट गोलंदाज दर्शन सहारे (नारायण इलेव्हन), उत्कृष्ट फलंदाज - मनोज माळघरे (जामुनपाडा, माळघरे किंग) यांना विशेष बक्षिस देण्यात आले.