पेठ - पेठ शहरातील गावच्या मध्यवस्तीत असलेल्या गावतळ्यात सकाळी १० वाजे दरम्यान मृतदेह तरंगत असल्याची खबर पेठ पोलीसांना लागली . घटनास्थळी पो. नि . गोंदके यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असता . तलावाच्या पूर्वबाजूच्या कडेस पानवेलीमध्ये पाण्यात उपडा पडलेला मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. नगरपंचायतीचे सफाई कामगार यांनी पाण्यात उतरूण प्लॅस्टीक मध्ये गुंडाळून बाहेर काढले असता २५ ते ३० वयोगटातील पुरुष जातीचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत किमान ४ ते ५ दिवसापूर्वी पडलेला असल्याचा कयास वर्तविण्यात आला . मृतदेहाचे हातावर हेमलता नाव गोंदलेले आढळले . सतत पाण्यात राहील्याने चेहरा व डोळे जवळपास नष्ट झाल्यात जमा असल्याने ओळख पटविणे अत्यंत जिकरीचे झाले आहे . पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून मृतदेहा बाबत कुणास माहीती असल्यास पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे अवाहन पोलीस निरीक्षक गोंदके यांनी केले आहे.
पेठच्या तलावात अनोखळी मृतदेह आढळला
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0