राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या सभासद नोंदणीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तयारी सुरू केली आहे.प्रत्येक गावातील जनतेच्या विविध समस्या प्रश्न सोडविण्यासाठी गावोगाव पक्षाचे संघटन मजबूत करत सभासद नोंदणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना राष्ट्रवादी परिवारात आणावे असे आवाहन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, बाळासाहेब जाधव, प्रकाश वडजे,सुरेश मामा कळमकर, सदाशीव शेळके शहाजी सोमवंशी, विलासराव कड ,विश्वासराव देशमुख,प्रकाश शिंदे,तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाडे, तालुका युवक अध्यक्ष कृष्णा मातेरे,गोकुळ झिरवाळ,महेंद्र बोरा, दत्तात्रय गटकळ, विष्णुपंत पाटील, सम्राट राऊत मधुकर भरसट ,कचरू पाटील, दत्तू चव्हाण, संजय केदार, संजय मोरे मधुकर बोरस्ते, सारंग घोलप ,अजित कड, अतुल निगळ, लक्ष्मण बागुल,रावसाहेब जाधव, मिथुन गवळी , अशोक बुवा, पिंटू मोंढे , प्रीतम देशमुख, विनोद देशमुख,गणपत बोडके, अमोल पवार आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाची सभासद नोंदणीस प्रारंभ
कृष्णा पवारमहाराष्ट्र ट्रायबल न्यूज
-
0