maharashtratribalnews

वरखेडा येथे श्री हनुमान मंदिर जीर्णोध्दार, मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

दिंडोरी l मनोज पाटील 
वरखेडा येथे श्री हनुमान मंदिर जीर्णोध्दार व नुतन मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने दि. सोमवार दि. 28 रोजीपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 
      या सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून दि. 28 रोजी श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा नुतन गणपती सरस्वती तसेच प्र.भु. श्रीराम मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी, प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दि. 30 रोजी अक्षय तृतीया मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. सप्ताह काळात दिपप्रज्वलन, कलशपूजन, ग्रंथपूजन, साहित्य पूजन, ध्वजपूजन, विनापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 12 वाजता गाथा भजन, 6 ते 7 वाजता हरीपाठ, रात्री 9 ते 11 वाजता हरीकिर्तन होणार आहे. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार आपली हरीकिर्तने करणार असून आहे. सोमवार दि. 28 रोजी ह.भ.प. श्रावण महाराज आहिरे (कुकाणेेकर),मंगळवार दि. 29 रोजी ह.भ.प. एकनाथ महाराज (चत्तर), बुधवार दि. 30 रोजी ह.भ.प. विश्‍वनाथ महाराज वारिंगे (मुंबई), गुरुवार दि. 1 रोजी ह.भ.प. बाळू महाराज गिंरगावकर (बीड), शुक्रवार दि. 2 रोजी ह.भ.प. शिवा महाराज बावस्कर (बुलाढाणा), शनिवार दि. 3 रोजी ह.भ.प. श्रावण महाराज जगताप (येवला), रविवार दि. 4 रोजी ह.भ.प. पांडूरंग महाराज गिरी (वावीकर),सोमवार दि. 5 रोजी ह.भ.प. प्रभाकर नाना झोलकर यांचे सकाळी 10 ते 12 काल्याचे किर्तन होवून महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या हरीकिर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, जय बाबाजी भक्त परिवार, गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने