सुरगाणा l प्रतिनिधी :-सुरगाणा पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील ६१ ग्रामपंचायत मधील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून यामध्ये 31 ग्रामपंचायत अनुसूचित महिला राखीव झाल्या आहेत. तर उर्वरित 30 ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी अनुसूचित जमाती सर्वसाधारण आरक्षित झाल्याने महिला व पुरुष दोघाना संधी मिळणार आहे. एक ग्रामपंचायती साठी तिसरीच्या वर्गातील विद्यार्थी पार्थ सागर सोनवणे याच्या हस्ते चिट्ठी काढण्यात आली. यामध्ये पळसन हि ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिला राखीव झाली.
2027 मध्ये होणार असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची आरक्षण सोडत पंचायत समिती सभागृहात पार पडली. उपजिल्हाधिकारी नरेश अनुकूरी व तहसीलदार मोहन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सुरगाणा तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी तहसीलचे संतोष मोरे, शेखर गांगुर्डे, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ तसेच सरपंच धनश्री हाडळ, राजेंद्र गावित, पांडुरंग वाघमारे, तुकाराम जाधव, विठ्ठल गावित, वनिता दळवी, मंजित चौधरी आदि सरपंच व सदस्य उपस्थित होते.
पन्नास टक्क्या पेक्षा जास्त आरक्षण याप्रमाणे 61 ग्रामपंचायत पैकी 30 ग्रामपंचायत अनुसूचित महिला राखीव झाल्या आहेत. तर उर्वरित 31 ग्रामपंचायत मधून चिट्ठी द्वारे अनुसूचित जमाती महिला राखीव करिता पळसन ग्रामपंचायतीचे नाव निघाले. बाकी 30 ग्रामपंचायत अनुसूचित जमाती खुला असल्यामुळे महिला व पुरुष उमेदवारी अर्ज करू शकणार आहेत. यामुळे सरपंच पदासाठी सर्वाधिक महिलांना संधी उपलब्ध झाली आहे.
*** अनुसूचित जमाती स्रियाकरिता आरक्षित झालेल्या 31 ग्रामपंचायत ---
अलुंगूण, आंबाठा, आंबोडे, बेडसे, भदर, बोरगाव, बुबळी, चिकाडी, डोल्हारे, हस्ते, हतगड, हातरुंडी, हेमाडापाडा, कळमणे, करंजूल (सु.), खिर्डी, खोबळा, खुंटविहीर, खोकरी, कुकुडणे, कुंकूडमुंडा, मांधा, मालगव्हाण, राशा, साजोळे, सराड, शिंदे दिगर, उंबरठाण, डांगराळे, आणि चिट्ठीद्वारे निघालेली पळसन ग्रामपंचायत. ( या एकतीस ग्रामपंचायत फक्त अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव)
*** अनुसूचित जमाती खुले आरक्षण 30 ग्रामपंचायत.---
बाऱ्हे, भवाडा, भवानदगड, भोरमाळ, बिवळ, चिंचपाडा, घोडांबे, गोंदुणे, हरणटेकडी, हट्टी जाहुले, काठीपाडा, कोठूळा, लाडगाव, मांगधे, म्हैसखडक, माळेगाव, माणी, मनखेड, मोहपाडा, नागशेवडी, पोहाळी, प्रतापगड, रगतविहीर, राहुडे, रोकडपाडा, रोंघाने, ठाणगाव, वाघधोंड, वरंभे. (या सर्व ग्रामपंचायत मध्ये निघालेल्या अनुसूचित जमाती खुले आरक्षणा नुसार महिला व पुरुष दोघांना संधी मिळणार आहे.