maharashtratribalnews

२६ एप्रिल रोजी बाऱ्हे येथे होणाऱ्या आदिवासी बोहाडा (भोवाडा) महोत्सवानिमित्ताने पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

बाऱ्हे l नामदेव पाडवी
सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे येथे २६ ते २८ एप्रिल पर्यंत चालणाऱ्या तीन दिवसीय आदिवासी बोहाडा महोत्सवानिमित्ताने बाऱ्हे पोलिस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक पार पडली.
       यावेळी आदिवासी बोहाडा उत्सव समितीचे बारा गाव बारा पाड्यातील आयोजक, ग्रामपंचायत सदस्य देविदास गावीत, पोलीस पाटील हंसराज खांबाईत, माजी सभापती मंदाकिनी भोये, उत्तम कडू, माजी सरपंच हुशार देशमुख, परशराम वार्डे, माजी उपसरपंच रामदास जाधव, सुरेश वार्डे मनोहर खांबाईत, गोरख महाले, शांतता कमिटी सदस्य तसेच बाऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलिस पाटील, राजकीय पदाधिकारी, तरुण युवक मंडळ तसेच पोलिस अधिकारी, कर्मचारी आदीसह बैठकीला उपस्थित होते.
      उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे वादविवाद निर्माण होवू नये, कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. बोहाडा उत्सव काळात कोणीही आक्षेपार्ह पोस्टर्स लावणार नाही. घोषणा देणार नाही. प्लास्टिक पिपाणी वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे आढळल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. यात्रोत्सव काळात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे रूग्णांसाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली आहे तसेच पोलीस पाटील यांनी आपल्या गावात जाऊन बोहाडा उत्सव काळात कुठेही गालबोट लागू नये व आपल्या गावची बदनामी होवू अशा सुचना सर्वांना कराव्यात, बाऱ्हे परिसरातील सामाजिक सलोख्याची भावना कायम राहून धार्मिक एकोपा टिकावा याकरीता सर्व धर्मियांनी सहकार्य करावे. आदिवासी बोहाडा कला महोत्सवात सामाजिक एकोप्याची परंपरा यापुढेही टिकवून ठेवून येणारे सर्व राष्ट्रीय सण एकात्मतेच्या भावनेतून व शांततेत पार पाडतील यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन राखोंडे यांनी केले.
आदिवासी बोहाडा उत्सव समितीला मार्गदर्शन करताना सहायक पोलिस निरीक्षक सोपान राखोंडे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने