दिंडोरी । प्रतिनिधी:-चिंचखेड येथील तरुणाचा हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून झालेल्या वादात धारदार शस्त्राचा वापर करून खून करण्यात आला. जोपूळ रोड येथील बाजार समितीच्या गेटसमोर शनिवारी रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू असताना रवी सोमनाथ गुंबाडे (23) यास मित्रांनी नाचण्यास सांगितले. त्याने नाचण्यास नकार दिला. त्यामुळे मित्रांमध्ये बाचाबाची झाली. मित्रांनी त्यास धारदार शस्त्राने मारहाण केल्याने रवी गुंबाडे याचा मृत्यू झाला. पिंपळगाव बसवंत येथील पोलीस स्टेशन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन मित्रांना अटक केली आहे. हेमंत परसराम जाधव, जनार्दन ज्ञानेश्वर गांगुर्डे, रमेश मुरलीधर शेखरे (सर्व रा. पिंपळगाव बसवंत अंबिकानगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पुढील तपास पोलीस अधीक्षक अपराजित अग्निहोत्री, उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव करीत आहेत.