maharashtratribalnews

दिंडोरी भाजप मंडल अध्यक्षांची निवड

दिंडोरी । मनोज पाटील :- भारतीय जनता पार्टीच्या दिंडोरी मंडल अध्यक्षपदी शामराव मुरकूटे यांची फेर निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे वणी मंडल अध्यक्षपदी वसंतराव कावळे, ननाशी मंडल अध्यक्षपदी योगेश मातेरे यांची तर पेठ मंडल अध्यक्षपदी पंकज पाटील यांची निवड करण्यात आली. 
       भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत हा निर्णय झाला असून याबाबत पत्र दिंडोरी निवडणूक निरीक्षक सौ. सीमा झोले यांनी दिली. शामराव मुरकूटे यांनी दिंडोरी मंडलाची चांगली जबाबदारी सांभाळली होती. पुन्हा त्यांची फेर निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे निवडीबद्दल माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव, जिल्हा पक्ष निरीक्षक गिरीष पालवे, निवडणूक निरीक्षक सीमा झोले, शिवाजी पिंगळ, चंद्रकांत राजे, प्रमोद देशमुख, विवेक कुलकर्णी, शाम बोडके, मनिषा बोडके, रणजित देशमुख, तुषार वाघमारे, राम कराटे, संपत पिंगळ, कैलास धात्रक, काका वडजे, उज्वला कोथळे, संध्या निरघुडे, निता भामरे, मंगला गायकवाड, अरुणा देशमुख, प्रज्ञा वाघमारे, आशा कराटे, तुषार घोरपडे, शरद मालसाने, रमेश क्षिरसागर, गोविंद बोडके, मित्रानंद जाधव, संजय कदम, राजेंद्र शिंदे, विजय कापसे, अमोल खोंडे, भास्कर गवळी, दिंगबर ढाकणे, गणेश गवळी, नीलेश खोंडे, योगेश गायकवाड, विशाल जाधव, गोकूळ जाधव, शांताराम जाधव, संपत पिंगळ, सागर गटकळ, बाळासाहेब सोनवणे, रोहिदास पाटील, अरुण धात्रक आदींसह दिंडोरी, पेठ तालुक्यातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने