मोहाडी l प्रतिनिधी :- येथील कुंभार समाजबांधवांतर्फे कुंभार गल्लीतील संत गोरोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात संत गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (ता. 26)सकाळी जलाभिषेक करण्यात आला. सकाळी साडेदहा ते बारादरम्यान श्रीकृष्ण वारकरी भजनी मंडळातर्फे संत गोरोबा महाराज यांचे अभंग गायिले. दुपारी बाराला संत गोरोबाकाका यांच्या समाधीपर अभंग म्हणून मूर्तीवर गुलालयुक्त पुष्प वाहण्यात आली. शिवाजी क्षीरसागर यांच्या हस्ते महाआरती होऊन प्रसाद वाटप करण्यात आला.
सायंकाळी सात ते नऊदरम्यान पुरुषोत्तम महाराज घुमरे यांचे 'रोहिदासा शिवराईसाठी! दिली पुंडलिका भेटी!!'या अभंगावर कीर्तन करत निरूपणात संत गोरोबा महाराज यांच्या जीवन कार्यावर निरूपण केले.भजनी मंडळाचे प्रवीण जाधव, रामभाऊ ढेपले, विष्णु खुर्दळ, शंकर तिडके, सोमनाथ जाधव, नारायण जाधव,भास्कर जाधव उपस्थित होते. कीर्तनात अमोल पाटील गायन तर आदित्य काळे यांनी मृदंग साथ केली.श्रीराम क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कीर्तनाचे आयोजन कारण्याचा संकल्प दिलीप क्षीरसागर यांनी केला आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी दामोदर क्षीरसागर, दिलीप क्षीरसागर,रमेश क्षीरसागर,निवृत्ती क्षीरसागर, चिंधु क्षीरसागर, केदारनाथ क्षीरसागर आदींसह समाज बांधव प्रयत्नशील होते.
मोहाडी : संत गोरोबाकाका पुण्यतिथी निमित्त शनिवारी कीर्तन करताना पुरुषोत्तम घुमरे.