दिंडोरी। प्रतिनिधी -दिंडोरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात लोक सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोक सेवा हक्क दिनाच्या औचित्य साधून प्रांत कार्यालयामध्ये लोकसेवा हक्का बाबत माहिती दर्शवणार्या बारकोड बोर्डाचे अनावरण कार्यालयाच्या दर्शनी भागा वर करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी यांना लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील तरतुदी, लोकसेवा दिनाचा उद्देश, त्याप्रती अधिकारी कर्मचारी यांचे अधिकार जबाबदारी व उत्तरदायित्व तसेच नागरिकांना ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने विहित कालमर्यादित सेवा तत्परतेने व सुलभतेने पुरवण्याबाबत प्रांताधिकारी यांनी मार्गदर्शन केले. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लोकसेवा हक्क दिवस निमित्त शपथ घेतली. याप्रसंगी प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी नागरिकांना जलद, तत्परतेने, सुलभतेने, पारदर्शक व गुणवत्तापूर्वक सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. अधिकार्यांनी, कर्मचार्यांनी सेवा वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब अडथळा होणार नाही यासाठी आवश्यक ती पावली उचलण्याबाबत सूचित केले. नागरिकांना पुरवण्यात येणार्या सेवेत अधिक गती व परिणामकारकता आणण्याबाबत संकल्प करण्याबाबत सूचित केले.