मोहाडी l प्रतिनिधी ता. 9 : गणेशगांव ( ता. दिंडोरी )येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने येथील हनुमान मंदिरात सुरु असलेल्या 13 व्या त्रिदिनी कीर्तन महोत्सवाची शुक्रवारी (ता. 9) सांगता झाली. महोत्सवात काकडा आरती, सामुदायिक हरिपाठ यासह गोकुळ महाराज खुर्दळ (देहू ),गोकुळ महाराज वाघचौरे (आळंदी ), माधव महाराज घुले (इगतपुरी)आदींची कीर्तने झाली.शुक्रवारी सकाळी आठला गावातून भाविकांनी हरीनामाच्या गजरात दिंडी काढली.भगव्या पताका व हरीनामाच्या जयघोषाणे अवघे गाव भक्तिमय झाले होते.दिंडीनंतर सकाळी दहा ते बारादरम्यान साहेबराव महाराज रहाणे(सुकेणकर)यांचे काल्याचे कीर्तन झाले.महाआरती होऊन महाप्रसाद झाला.महोत्सवात चहाची व नाष्ट्याची व्यवस्था संपत भवर यांनी केली होती.यशस्वीतेसाठी सीताराम भवर,बाळासाहेब भवर, विनायक भवर यांच्यासह भजनी मंडळ, ग्रामस्थ प्रयत्नशील होते.
गणेशगांव : हनुमान मंदिरात शुक्रवारी काल्याचे कीर्तन करताना साहेबराव महाराज रहाणे.