कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा सुरगाणा तालुक्यातील मालगव्हाण येथे पार पडली, कार्यशाळेत इगतपुरी येथील कृषी संशोधन केंद्राचे प्राध्यापक रंगनाथ बागुल, निफाड येथील उपविभागीय कृषी अधिकारी जयंत गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाणी फाउंडेशनची गटशेती संकल्पना सांगणारी चित्रफीत दाखवण्यात आली.
कार्यशाळेत भात, नाचणी, सोयाबीन पिकावरील लागवड तंत्रज्ञान, कीड व रोग नियंत्रण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. 'अनुभवातून वा प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण' याविषयी विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बीज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता चाचणी, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क तयार करणे, कामगंध सापळे, चिकट सापळे, श्री पध्दतीने भात लागवड, माती नमुना कसा घ्यावा, सीआरए तंत्रज्ञान वापरून आंबा लागवड, खते, बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, शेतकरी शेती शाळा याबाबत प्रात्यक्षिके सादर करण्यात आली होती.
उगवण क्षमतेची माहिती