दिंडोरी । मनोज पाटील:- येत्या १० तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे येथे वर्धापन दिन होणार असून या वर्धापन दिनाला सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन युवक नेते गोकूळ झिरवाळ यांनी केले.
दिंडोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांची बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी गोकूळ झिरवाळ बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे यांनी पुणे येथे होणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाची माहिती दिली. सर्व कार्यकर्त्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या दिंडोरी पासून पूर्व भागातील कार्यकर्त्यांनी प्रवासाचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन यशस्वी करून ना. अजितदादा पवार व ना. नरहरी झिरवाळ यांचे हात बळकट करावे असे आवाहन राजेंद्र उफाडे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश शिंदे, कादवा कारखान्याचे संचालक बाळासाहेब जाधव, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन गणपतराव पाटील, ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे, दिंडोरी पंचायत समितीचे माजी सभापती सदाशिव शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास कड, माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ, आदींनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांचा सहभाग जास्तीत जास्त राहील.
याप्रसंगी सुरेश कळमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे, विष्णू संधान, माधवराव साळुंखे, विनोद देशमुख, नरेंद्र पेलमहाले, गोपीनाथ पाटील, बबन जाधव, एकनाथ गायकवाड, हिरामण गावित, संजय केदार, संजय मोरे, अजित कड, अतुल निगळ, सुनील बोरस्ते, अनिकेत बोरस्ते, डॉ. विजय गटकळ, प्रतिक जाधव, सचिन धुमणे, बापू तासकर, परिक्षित देशमुख, जयवंत जाधव, नीलेश पेलमहाले, संदीप गोतरणे, मधुकर बोरस्ते, विजय पाटील, सुभाष मातेरे, शिवाजी मातेरे, सलीम मिर्झा, सरफराज तांबोळी, अनिल ठुबे, राहुल कावळे, सचिन कावळे, तुषार दवंगे अमोल पवार, दत्तात्रय गटकळ, मंगेश घोलप, संगीता राऊत, पंडित बागुल, निवृत्ती मोंढे, बाळू जोपळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.