महाराष्ट्र ट्रायबल न्युज

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दिंडोरी । मनोज पाटील 
दिंडोरी तालुक्यातील जांबुटके, निळवंडी, पाडे, हातनोरे, वाघाड येथील शेतकर्‍यांना सोयाबीन  उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकद्वारे शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले.
        उपविभागीय कृषी अधिकारी अशोक दमाले, तालुका कृषी अधिकारी नाना भोये, मंडळ कृषी अधिकारी चेतन चव्हाण, उप कृषी अधिकारी शामकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बैठक/प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी रेणुका सातपुते, पुष्पा गावित यांनी भात पिकासाठी 3% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया, 2.5 ग्रॅम थायरम रासायनिक बीज प्रक्रिया, जैविक बिजप्रक्रिया 250 ग्रॅम अ‍ॅझोटोबॅक्टर प्रति दहा किलो बियाण्यास चोळावे. सोयाबीन पिकासाठी ट्रायकोड्रमा पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे, रायझोबिएम, पीएसबी 250 ग्रॅम दहा किलो बियाण्याला हलक्या हाताने चोळावे, सोयाबीनची उगवण क्षमता एका ओल्या पोत्यावर 100 बिया घेऊन 10 बियाणे च्या 10 ओळी तयार करून  त्याची गुंडाळी करून सावलीत ठेवावी व त्याला पाणी शिंपडावे त्यानंतर चौथ्या दिवशी उगवण क्षमता किती टक्के येते हे तपासणी करून घ्यावी आदी प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आले. कृषी आधारित व्यवसाय युनिट उभारणी, कृषी निवृष्ठांच्या वापराबाबत जनजागृती, पीक स्पर्धा, भात पिकामध्ये युरिया ब्रॅकेटचा वापर, व्हाट्सअप ग्रुप, हिरवळीच्या खतांची निर्मिती व वापर, फळबाग लागवडीमध्ये सीआरए तंत्रज्ञानाचा वापर, हुमणी किड एकात्मिक व्यवस्थापन मोहीम अशा प्रकारच्या विविध मोहीम राबविण्यात आल्या. अ‍ॅग्रीस्टक किसान कार्ड काढून घेणे, महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करणे, पी एम किसान, खरीप पिक प्रात्यक्षिक, चठएॠड फळबाग लागवड अशा विविध कृषी विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. या खरीप हंगाम मोहिमेला शेतकर्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने