बोरगाव । प्रतिनिधी:- सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, तंट्या मामा, राणी दुर्गावती, राघोजी भांगरे, उमाजी सनाईक यांच्या प्रतिमांचे पूजन सुरगाणा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब दिघे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डांगी नृत्य, पावरीवादन, र संबळ वाद्य, नंदी नृत्य, ढाक गीत, रावण राजा ताटी सादर करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी ठेका धरत आनंद घेतला. परिसरातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब दिघे, सहायक पोलिस निरीक्षक अंबादास बैरागी व बोरगाव बीटमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बोरगाव येथे आदिवासी दिनानिमित्त पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करताना आदिवासी युवक.