महाराष्ट्र ट्रायबल न्युज

प्रबोधन विद्यालय आंबाठा या शाळेत जागतिक आदिवासी दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

सुरगाणा l कृष्णा पवार :- ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन प्रबोधन विद्यालय आंबाठा ता.सुरगाणा या शाळेत मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाला आधार देणारी,आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन  पुरस्कृत होती.फाऊंडेशनचे सदस्य,व प्रबोधन विद्यालयाचे शिक्षक श्री.रामभाऊ गावित सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.परशराम पाडवी सर, आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन सल्लागार हे होते. तर प्रमुख पाहुणे प्रबोधन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक फादर अनाक्लीट फर्नांडिस होते. मान्यवरांमध्ये स्टीम चे फादर पिंटो व त्यांची टिम. व शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर थेरेसा वसावा होत्या. 
    प्रबोधन विद्यालयाचे इ.८ वी ते १० वी पर्यंतच्या १४ सामुहिक नृत्य व १२ वैयक्तिक नृत्य सादरीकरण करण्यात आले. त्यापैकी सामुहिक नृत्य यांमध्ये इ.८ वी ब तुकडीच्या मुलींनी बाजी मारत प्रथम क्रमांक तर दुसरा क्रमांक इ.१० वी मुली यांनी आणि तृतीय क्रमांक इ.९ वी अ यांनी पटकावला.तर वैयक्तिक नृत्य मध्ये इ.८ वी अ तुकडीची कुमारी.कशिस गावित हिने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक कु.ओमकार गावित इ.९ वी ब यांनी आणि तृतीय क्रमांक कुमारी यमुना गावित इ.९ वी ब हिने पटकविला.सर्व विद्यार्थ्यांना आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन कडून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व बक्षिसे व प्रमाणपत्र हे आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री.रतन धुम  यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशन कडून देण्यात आली.
      अध्यक्षीय भाषणात श्री.पाडवी सरांनी बहुमूल्य मार्गदर्शन करताना सांगितले की,आमची फाऊंडेशन जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यांत नैसर्गिक आपत्तीत ग्रस्त कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आधार देते. आदिवासी विद्यार्थ्यांना कला गुणांना वाव मिळावा म्हणून असे उपक्रम करत आहे.विद्यार्थांना शैक्षनिक साहित्य देऊन प्रोसहन देते.असे अनेक उदाहरणे दिली. आदिवासी देव-देवतांची यथोचित माहिती दिली.आपल्या वैयक्तिक जीवनातील प्रसंग व्यतीत केले.शिवाय फाऊंडेशन मध्ये जवळपास ४०% सदस्य हे प्रबोधन विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. श्री पाडवी सरांनी शालेय जीवनात प्रबोधनाच्या आठवणींना उजाळा दिला.
       प्रमुख पाहुणे फादर. फर्नांडिस म्हणाले की, आदिवासी संस्कृतीचे जतन करून संस्कृती टीकवली पाहिजे.सिस्टर थेरेसा वसावा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली.व नियोजक श्री.गावित सर यांचे कौतुक केले.
       सूत्रसंचालन कुमारी. रोहीणी देशमुख इ.१० वी. हिने केले. तर सदगीर सर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने