महाराष्ट्र ट्रायबल न्युज

सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; प्रशासनाकडे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन

बोरगाव l लक्ष्मण बागुल :- सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेती तसेच रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. 
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान सहन करावे लागत असून, रस्त्यांची दुरवस्था गंभीर झाली आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप याकडे पुरेशी दखल घेतली नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सुरगाणा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पक्षाचे तालुका सचिव कॉ. भिका राठोड, कॉ. भास्कर जाधव, कॉ. संजय पवार, कॉ. परशराम गावित, कॉ. रमेश वाघमारे, कॉ. मनोहर खांबाईत, कॉ. काशिनाथ वळवी, कॉ. जिवा भोये, कॉ. रामा बोरशे व पांडू कनोजे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत, नुकसानभरपाई आणि तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने