महाराष्ट्र ट्रायबल न्युज

इनर व्हील क्लब ऑफ जन नेक्स्ट, नाशिक संस्थेचा "Dream Project हॅपी स्कूल” उपक्रमातून बाडगीचापाडा शाळेचा कायापालट

खोकरविहिर I प्रतिनिधी:- दि. 20 एप्रिल 2026 
दिंडोरी तालुक्यातील बाडगीचापाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “हॅपी स्कूल” उपक्रमाअंतर्गत इनर व्हील क्लब ऑफ जन नेक्स्ट, नाशिक या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध शैक्षणिक व पायाभूत सुविधांचा विकास करत शाळेचे आकर्षक व उपयुक्त रूपांतर करण्यात आले.
या उपक्रमात शाळेच्या वर्गखोल्या, कंपाऊंड वॉल, स्वयंपाकघर, मुलांचे व मुलींचे शौचालय यांचे रंगकाम करून संपूर्ण परिसराला नवचैतन्य देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी प्रिंटर, शाळेच्या बॅगा, स्टेशनरी साहित्य तसेच क्रीडासाहित्यामध्ये बॅडमिंटन रॅकेट्स, बुद्धिबळ, कॅरम बोर्ड व स्किपिंग रोप्स उपलब्ध करून देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत UV वॉटर प्युरीफायर बसविण्यात आला असून स्वच्छतेसाठी हँड वॉश स्टेशनही उभारण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना पोषणपूरक आहार म्हणून केळींचे वाटप करण्यात आले.
नवीन सुसज्ज वर्गखोलीचे उद्घाटन रोटरी नॉर्थ डिस्ट्रीक गव्हर्नर डीजी नाना शेवाळे सर, इनर व्हील ऑफ जेन नेक्स्ट क्लब नाशिकच्या अध्यक्षा रमा वर्मा यांच्या हस्ते संपन्न झाले. इनर व्हील क्लब ऑफ जेन नेक्स्ट नाशिक च्या अध्यक्षा रमा वर्मा मॅडम 
कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, “समाजसेवा करताना देशाच्या भविष्याचा विचार महत्त्वाचा आहे. आपली मुले हेच देशाचे भविष्य असून त्यांचे आरोग्य, शिक्षण व सुरक्षितता यावरच भारताचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहे.”
इनर व्हील क्लबचे सेवा, मैत्री आणि सशक्तीकरण या तत्त्वांवर आधारित “हॅपी स्कूल” प्रकल्पातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी डीजी नाना शेवाळे, अनुपमा शेवाळे, अध्यक्षा रमा वर्मा, राजेंद्र वर्मा, सेक्रेटरी अंकिता पाटील, वाइस प्रेसिडेंट शाल्मली शेट्टी, ट्रेझरर विद्या साखरे, एडिटर नसीम राजा, प्रियंका समुद्रा, फर्स्ट लेडी अनुपमा शेवाळे,भाग्यश्री यांच्यासह गावचे सरपंच, पोलीस पाटील शंकर तुंगार , सुवर्णा मॅडम (शिक्षिका), विद्यार्थी, पालक व क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या शिक्षिका सुवर्णा यांना इनर विल्स क्लब ऑफ जेन नेक्स्ट च्या अध्यक्षा यांनी साडी देऊन सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे इनर विल्स क्लब ऑफ जेन नेक्स्ट नाशिक या संस्थेतेत सर्व महिलाची संस्था असल्याने या संस्थेच्या माध्यमातून नाशिक जिल्हातील महिलासाठी ग्रामीण भागातील महिलांना पाणी दूरवरून आणावे लागत असल्याने डोक्यावरील हंडा कमी व्हावा म्हणून तीन वर्षापासून रोलर ड्रम वाटप केले जात आहेत, आरोग्य शिबीर, विविध शाळाना शैक्षणिक साहित्य वाटप केलं आहे तसेच शाळेतील शिक्षकाची निवड करून पुरस्कार वितरण करण्यात येतं आहे. 
बाडगीचापाडा या उपक्रमामुळे शाळेचे शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध व प्रेरणादायी झाले असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
इनर विल्स क्लब ऑफ जेन नेक्स्ट नाशिक या संस्थेने बाडगीचापाडा शाळेचे केलेलं शुशोभीकरण व शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य, पेय जल सेवा, प्रिंटर, वर्ग खोली, वॉल कंपाऊंड, स्वयंपाकघर किचन, मुला मुलींचे शौचालय पाहून परिसरात संस्था अध्यक्षा रमा वर्मा व संस्थेचे कौतुक होत आहे तसेच शाळेत हँप्पी स्कुल उपक्रमाअंतर्गत शाळेचा संपूर्ण कायापालट करण्यात आला असून, विध्यार्थीसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या उपक्रमामूळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या चेहराऱ्यावर समाधान आणि उत्साह स्पष्ट दिसून येतं आहे. या ड्रीम प्रोजेक्ट केवळ भौतिक सुविधा पुरविणारा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा ठरत असल्याचे मत उपस्थितानी मत व्यक्त केले. शाळा बदलली की गांव बदलते आणि गांव बदलले की देश घडतो या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुकाचे थाप पालकांनी संस्था अध्यक्षा रमा वर्मा यांना दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने