महाराष्ट्र ट्रायबल न्युज

हतगड येथे धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानास प्रारंभ.

बोरगाव l लक्ष्मण बागुल:- गावाच्या सर्वांगीण विकासासाठी व जनजाती समाजाच्या प्रगतीसाठी "धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान" अंतर्गत आदी कर्मयोगी एकदिवसीय कार्यशाळेचे विशेष आयोजन मंगळवारी दि 23सप्टेंबर 2025 रोजी हतगड (ता.सुरगाणा) येथे करण्यात आले.
   सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. टी. सुर्यवंशी वविस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, माधवराव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली ही एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
 या कार्यक्रमास विवेकानंद निकम व जगदीश सोनवणे यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत हतगड येथील सरपंच देविदास दळवी तसेच गटातील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांच्या उपस्थितीत तसेच स्थानिक जनप्रतिनिधी, समाजातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   याप्रसंगी बोरगाव, साजोळे, हतगड, पोहाळी, नागशेवडी, मोहपाडा, घोडाबे, हरणटेकडी, राहुडे, उंबरपाडा, सराड, मनखेड, हेमाडपाडा, जाहुले, मांगदे, वरंभे, चिकाडी, माळेगाव, रोकडपाडा, डांगराळे, शिंदे दिगर येथील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात धरती आबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. 
   यावेळी विवेकानंद निकम यांनी या अभियानाचा उद्देश जनजाती समाजाच्या शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण तसेच रोजगार निर्मिती या क्षेत्रात सकारात्मक बदल घडविणे हा आहे . महिलांसाठी स्वावलंबनाशी संबंधित मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच देविदास दळवी यांनी ग्राम उत्कर्ष अभियानामुळे गावाचा विकास, जनजाती समाजाचे आत्मनिर्भर भविष्य आणि धरती आबा यांच्या विचारांची प्रेरणा पुढे नेण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी एकमुखाने ग्रामविकासासाठी सहकार्य करण्याची शपथ घेतली.
   या कार्यक्रमामुळे जनजाती समाजात नवचेतना निर्माण झाली असून ग्राम उत्कर्ष अभियान गावाच्या प्रगतीस नवा वेग देईल , असा विश्वास ग्रामपंचायत अधिकारी के .के. पवार यांनी व्यक्त केला. व सर्व मान्यवरांचे उपस्थित ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने