महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अनुभूति टुर्सच्या वतीने तसेच पर्यटक व सहकारी मित्रांच्या मदतीने प्रशिक्षणार्थींना शूज व गोळाफेक साहित्याचे वाटप

नाशिक l प्रतिनिधी: पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेली अनुभूति टुर्स ही संस्था केवळ पर्यटनापुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीही जपत असून नुकतीच अनुभूती टूर्स या संस्थेने सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे पोलीस ठाण्यास भेट देऊन ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण उपक्रमाला हातभार लावला.
    या उपक्रमाअंतर्गत अनुभूति टुर्सच्या वतीने तसेच पर्यटक व सहकारी मित्रांच्या मदतीने प्रशिक्षणार्थींना शूज व गोळाफेक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी ही मदत अत्यंत मोलाची ठरणारी आहे. अनुभूती टूर्स व्यवस्था पक आणि पर्यटक यांच्या सामाजिक बांधिलकीतून बाऱ्हे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणार्थी आवश्यक शूज गोळाफेक साहित्य शारीरिक तयारीस उपयुक्त साधनसामग्री
  या साहित्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना आत्मविश्वास मिळेल, शारीरिक क्षमता वाढेल आणि भविष्यात पोलीस दलात भरती होण्यासाठी ते अधिक सक्षम होतील हा उद्देश ठेवून मदत देण्यात आली अनुभूति टुर्सचे व्यवस्थापक अशिष शिंपी यांनी सांगितले की,
“पर्यटनातून मिळणाऱ्या अनुभवांसोबत समाजासाठीही काही देणं ही आमची जबाबदारी आहे. आपल्या छोट्याशा सहकार्याने युवकांच्या भविष्याला दिशा मिळेल, हेच खरे समाधान आहे.”

बाऱ्हे प्रशिणार्थीना मदत दिल्या प्रसंगी

"बाऱ्हे ठाण्याचे एपीआय प्रदीप गिते व प्रशिक्षणार्थींनी अनुभूति टुर्सचे मनःपूर्वक आभार मानले. ग्रामीण भागातील तरुणांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून, समाजसेवा आणि पर्यटन यांचा सुंदर संगम यातून दिसून येत आहे."

अनुभूती च्या छोट्या प्रयत्नाने मोठा बदल घडवता येतो – हा संदेश सुरगाणा पर्यटन या उपक्रमातून अधोरेखित झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने