ननाशी | विनोदगायकवाड:- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिकच्या सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संघटनेच्या वतीने नुकताच नाशिक येथे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले,माजी महापौर रंजना भानसी,सामाजिक कार्यकर्ते प्रविम जाधव आदिच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला .यावेळीआदिवासी विकास विभागात प्रामाणिक आणि सचोटीने सेवा देणाऱ्या सुमारे 200कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.यात ननाशी शासकीय आश्रमशाळेचे माजी प्राचार्य एस.बी.बधान यांनामान्यवारांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पी.के.महाले,अध्यक्ष पी.डी.जोपळे आदिनी मनोगत व्यक्त करतांना संघटनेच्या कार्याची माहिती दिली.या प्रसंगी संघटनेचे सचिव एस.बी.बधान,प्रकाश विधाते,सहारे,गावंडे आदिसह संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.