महाराष्ट्र ट्रायबल न्युज

किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन वाटप व आरोग्य मार्गदर्शन

पेठ l प्रतिनिधी:-दिनांक 03/10/2025 रोजी सांस्कृतिक सभागृह हरणगाव येथे एमईटी भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक आणि ग्रामपंचायत हरणगाव ता. पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन तसेच सॅनिटरी नॅपकिन पॅडचे वाटप कार्यक्रम पार पडला.
   यावेळी डॉ.अंजली.मॅडम सहाय्यक प्राध्यापक, आणि अनुष्का देवरे, मॅडम सहाय्यक प्राध्यापक MET भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव,नाशिक यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, पोषण, शारीरिक व मानसिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मासिक पाळीदरम्यान योग्य काळजी घेण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
   ग्रामपंचायत व शैक्षणिक संस्थेच्या या संयुक्त उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींमध्ये आरोग्य जागरूकता वाढीस लागणार आहे.
   कार्यक्रमास संस्थेचे अधिकारी, हरणगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पल्लवीताई विजय भरसट, ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक, माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थीनी, ग्रामपंचायत अधिकारी मोहन गायकवाड, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती.वर्षा जेजुरकर तसेच विजय भरसट, युवराज पवार, चंद्रसेन जाधव, गोवर्धन गायकवाड, ओमप्रकाश वाघमारे, पंडित वाघमारे, राजू भरसट, विश्वनाथ ठेवणे, संगीता ठेपने, वेणूताई जाधव, पुष्पा भोये, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने