महाराष्ट्र ट्रायबल न्युज

युवानेते गोकुळ झिरवाळ यांच्या पुढाकाराने एसबीआय बँकेकडून शाळेला बॅरिकेड भेट

दिंडोरी l वैभव पगार :- महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांचे सुपुत्र युवानेते गोकुळ झिरवाळ यांच्या पुढाकाराने दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाला भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) माध्यमातून बॅरिकेड उपलब्ध करून देण्यात आले.
दिंडोरीतील या शाळेत सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना नाशिक–वणी महामार्ग ओलांडावा लागतो. त्या वेळी शाळेतील शिक्षक स्वतः रस्त्यावर उभे राहून वाहने थांबवून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता पार करण्यास मदत करतात. काही वेळा वाहनचालक वेगाने गाडी आणत असल्याने अपघाताचा धोका निर्माण होत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन युवानेते गोकुळ झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एसबीआय बँकेच्या सहकार्याने बॅरिकेड उपलब्ध करून दिले.
    या प्रसंगी एसबीआय बँकेच्या कांचन गायकवाड, विलास जाधव, प्राचार्य शरद शेजवळ, राष्ट्रवादी युवक नेते कृष्णा मातेरे, प्रतीक जाधव, विक्रम मवाळ, परीक्षित देशमुख, अनिकेत बोरस्ते, मंगेश घोलप, उपप्राचार्य उत्तम भरसठ, यशवंत दाणी, डी. के. टोपले, राजेंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
    प्राचार्य शरद शेजवळ यांनी झिरवाळ यांचे व बँकेचे मनःपूर्वक आभार मानले. “शाळेच्या तातडीच्या गरजेसाठी मिळालेल्या या बॅरिकेडमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता अधिक वाढेल,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोष कथार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने