महाराष्ट्र ट्रायबल न्युज

आजारपणावर मात करत महिला तलाठी कर्तव्यावर हजर

दिंडोरी । प्रतिनिधी :- निसर्ग आणि नियती कधी काय करेल, याचा भरोसा नसतो. नियती कधी कधी क्रुर खेळ खेळत असते. प्रचंड दु:ख वाट्याला देवून नियती परिक्षा पाहत असते. परंतू अशाच दु:खाचा सामना करत नाशिक येथील महिला तलाठी कर्मचारी शेतकर्‍यांचे अश्रु पुसण्यासाठी बांधावर जात आहे व सात्वन करीत त्यांचे पंचनामे करीत आहे. 
     नाशिक महसूलच्या तलाठी प्रिया नाना पगारे ह्या सध्या तहान भुक आजारपण विसरुन शेतकर्‍यांच्या बांधावर हजर झाल्या आहेत. प्रिया पगारे यांचे पती हे पोलिस दलात कार्यरत आहे. करोना काळात चौवीस तास कर्तव्य निभवत असतांना पगारे यांच्या पतीना करोनाने गाठले व त्यातच त्यांचे दोन्ही किडण्या निकामी झाल्या. याच दरम्यान सासु-सासरेचे निधन झाले. नात्यातील कोणाचेही किडणी उपलब्ध नसल्याने अखेरीस प्रिया पगारे यांनीच स्वत:ची किडणी पतीला दिली. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या दरम्यान त्यांचे बाळ सुध्दा त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आले होते. एका माता एक पत्नी  अशा रुपात त्यांची मनस्थिती संघर्षमय झाली होती. दोघेही सध्या जीवनात संघर्ष करत जगत आहे. आता काम करीत असतांना थोडे प्रकृत्तीकडे दुर्लक्ष झाल्याने प्रिया पगारे यांच्या प्रकृत्तीलाही त्रास सुरु झाला आहे. महिला कर्मचारी असल्याने त्यांना अखेरीस वेळोवेळी महिलांसाठी लागणार्‍या सुविधा उपलब्ध होवू शकल्या नाही. त्यामुळे त्यांचा आजार आता बळावला आहे. तरी सुध्दा त्या  शेतकर्‍यांचे अवकाळी पावसात नुकसान झाल्याने स्वत:चा आजार विसरुन शेतकर्‍यांच्या मदतीला धावल्या आहेत. ओढा परिसरातील शेतकर्‍यांच्या भेटीगाठी घेवून त्या पंचनामे करीत आहे. एकाच दिवसात त्यांनी 65 शेतकर्‍यांचे पंचनामे केले आहे. शेतकर्‍यांना धीर दिला. शासन शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नाही असे आश्‍वासन दिले. स्वत: आजारी असतांना शेतकर्‍यांची बांधिलकी जपणारी ही आधुनिक सती सावित्रीच म्हणावी लागेल. तिच्या कर्तव्य निष्ठेची दखल तहसिलदार पंकज पवार यांनी घेवून कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने