दिंडोरी । प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यात झालेल्या नुकसानीबाबत व तत्काळ मदत मिळावी, या मागणीसाठी माजी आमदार धनराज महाले यांनी राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीष महाजन यांची भेट घेवून शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी त्यांनी सरकार शेतकर्यांना वार्यावर सोडणार असे आश्यासित केले.
दिंडोरी तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून प्रचंड पाऊस पडत आहे. तसेच शेतकर्यांच्या द्राक्षबागा, सोयाबीन, भुईमुंग व भाताचे पीक या अवकाळी पावसाने संपूर्ण वाया गेले आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी झालेल्या पावसाने शेतकर्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. दरवर्षी शेतकर्यांनान नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने जी काही मदत जाहीर केली ती मदत दिवाळीपूर्वी मिळणार होती, परंतु अजूनही अनेक शेतकरी त्या मदतीपासून वंचित आहे. या वंचित असणार्या सर्व शेतकर्यांना तात्काळ मदत द्यावी व शेतकर्यांना या संकटातून सरकारने बाहेर काढावे या मागणीसाठी माजी आमदार धनराज महाले यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यांनी शेतकर्यांच्या प्रति सरकार संवेदनशील आहे. कुठल्याही शेतकर्याने चुकीचे पावले उचलू नये. सरकार सर्व पतरी प्रयत्न करत आहे व भविष्यातही हे सरकार शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही असे आश्वासित केले. याप्रसंगी शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, माजी जिल्हा परिषद गटनेते गटनेते प्रवीण जाधव, अमोल देशमुख, नंदू बोंबले, वैभव महाले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.