दिंडोरी । मनोज पाटील:- दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड ते जऊळके वणी या रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने धारकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे त्वरीत रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन चिंचखेड ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
चिंचखेड ते जऊळके वणी इ.जि.मा. 92 हा रस्ता मागील एक वर्षापूर्वी नुतनीकरन डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु सदरील ठेकेदारांनी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे रस्ता सहा महिन्यातच जागोजागी उखडल्यामुळे खराब झाला आहे. त्याचप्रमाणे गेल्या सहा महिन्यांपासून सतत पाऊस अतिवृष्टीमुळे अगोदरच निकृष्ट दर्जाचा असलेला रस्ता पूर्णपणे खड्डे युक्त खराब झाला आहे. परिसरातीलबाजार पेठेला जाण्यायेण्या करता तसेच कृषी उत्त्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतला शेतकर्यांना आपला शेत माल घेवून जावा लागतो. तसेच विद्यार्थ्यांना शाळा, विद्यालय महाविध्यालयमध्ये जाण्या येण्या करता वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने छोटे - मोठ्या अपघातांना जावे लागत आहे. त्याचप्रमाणे शारिरीक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. तरी रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सरपंच राधाबाई सताळे, उपसरपंच सुरेखा संधान, सोसायटीचे संचालक शिवानंद संधान यांनी केली आहे.