महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*पुढचा आमदार भाजपचा द्या : जलसंपदामंत्री गिरीश महाजन* *माजी आमदार रामदास चारोस्करांचा समर्थकांसह भाजपात प्रवेश*

दिंडोरी । प्रतिनिधी :- भाजप हा सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. यात घराणेशाही कुठेही दिसत नाही. मोदीजी हे तीन वेळा देशाचे नेतृत्व करत आहे. मी देखील सात वेळा आमदार आहे. त्यामुळे येथे सर्वांना संधी मिळणार आहे. रामदास चारोस्कर हा तुमचा शेवटचा प्रवेश असून आता कुठेही जाऊ नका. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काम सुरू करा.चमत्कार करून सर्व उमेदवार निवडून आणा. दिंडोरीत रस्त्यांचा प्रश्‍न गंभीर असून पुढच्या वेळी याठिकाणी भाजपचा आमदार द्या, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. 2024 साली तुतारी चिन्हावर दिंडोरी विधानसभा निवडणुकीतून निवडणूक लढविलेल्या सुनिता चारोस्कर यांनी त्यांचे पती माजी आमदार रामदास चारोस्करांनी आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनिता चारोस्कारांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी द्राक्षबागांचे सर्वेक्षण करून नुकसानीचा आढावा घेतला. द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी भरीव मदतीची मागणी केली असून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे महाजन यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण म्हणाले की, भारतात भाजप ही सर्वात मोठी आणि विकासाभिमुख राजकीय शक्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास वेगाने होत असून दिंडोरीतही विकासाच्या नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे व नुकसानभरपाई देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्ता देण्याचे आवाहनही त्यांनी केले. पक्षप्रवेशानंतर माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी भाजपने दिलेली कोणतीही जबाबदारी निष्ठेने पार पाडत पक्षाचे ध्येय आणि धोरणे राबवू, असे सांगितले. डॉ. भारती पवार, सुनील बच्छाव यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, विजय चौधरी, रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, चंद्रकांत राजे, शाम मुरकुटे, नरेंद्र जाधव, सुरेश डोखळे, शाम बोडके, प्रमोद देशमुख, शिवाजी पिंगळ, विवेक कुलकर्णी, वसंत कावळे, योगेश मातेरे, योगेश तिडके, रणजित देशमुख, नितीन गांगुर्डे, तुषार घोरपडे, विलास देशमुख, उज्वला उगले, संपत पिंगळ, पंकज पाटील, नंदु गवळी, संजय कदम, शिवानंद संधान, शांताराम जाधव, सागर बोरस्ते, मंदा गायकवाड, निता भामरे, दिंगबर ढाकणे, गोविंद बोडके, प्रभाकर वडजे आदींसह दिंडोरी, पेठ तालुक्यातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यांनी केला भाजपात प्रवेश
दिंडोरी बाजार समिती सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष शाम हिरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र ढगे, दिंडोरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष माधुरी साळुंखे, नगरसेवक अ‍ॅड. प्रदीप घोरपडे, अ‍ॅड. गणेश बोरस्ते, नगरसेविका मेघा धिंदळे, दिंडोरी पंचायत समितीचे माजी उपसभापती कैलास पाटील, वसंत थेटे, विठ्ठल अपसुंदे, राकेश शिंदे, सुनील मातेरे, उत्तम जाधव, गुलाब जाधव, दत्तू भेरे, अरुण गायकवाड यांच्यासह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने