महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*दिंडोरीत कार विहिरीत कोसळून नऊ जणाचा मृत्यू*

दिंडोरी । प्रतिनिधी :- दिंडोरी येथून खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून इंदोरे येथे घरी परतणाऱ्या दरगोडे कुटुंबीयांची कार रस्त्यालगत असलेल्या खोल विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात नऊ जण ठार झाले. ही घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
     या घटनेची माहिती कळताच नाशिक, पिंपळगाव, दिंडोरी येथील बचाव पथक, अग्निशमन दलाने तत्काळ बचाव कार्य करत विहिरीतून कार बाहेर काढली. यात पाच जणांचे मृतदेह हाती लागले. यामध्ये कारचालक सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे यांचा समावेश आहे. उर्वरित चार जणांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

      याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी शहरातील
   खासगी क्लासच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन राजे बँक्वेट हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी इंदोरे येथील दरगोडे कुटुंबीय उपस्थित होते. रात्री नऊ वाजेनंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यावेळी घराकडे निघालेल्या दरगोडे कुटुंबियांतील सुनील दरगोडे हे एक्सएल ६ कार (क्र. एमएच १५ जेएस १०५३) मध्ये सर्वांना बसवून घराकडे निघाले होते. गाडी दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात आल्यानंतर चालक सुनील यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्त्यालगतच्या विहिरीचा कथडा तोडून कोसळली. खोल असलेल्या विहिरीत पाणी अधिक असल्याने गाडी त्यात पूर्ण बुडाली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील
     नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली. मात्र, अंधार आणि विहिरीत पाणी असल्याने नाशिकच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळवण्यात आले. त्याचबरोबर पिंपळगाव येथील अग्निशमन दल, दिंडोरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीला नागरिकांनीही बचाव कार्यात सहभाग घेतला. मात्र, अंधार असल्याने त्यात अडथळा येत होता. नाशिक येथून आलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने फ्लड लाईट आणि क्रेनच्या सहाय्याने गाडी विहिरीतून बाहेर काढली. त्यातील पाच जणांना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने