दिंडोरी । प्रतिनिधी:- दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार झाल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे.
उमराळे बुद्रुक येथील कैलास दामोदर केदार यांच्या राहत्या घराजवळी दिवसाढवळ्या सायंकाळी चार वाजेच्या सुमारास बिबट्याने सहा शेळ्यांवर अचानक हल्ला करून ठार केल्या आहे. त्यामुळे उमराळे बुद्रुक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या मृत पावलेल्या शेळ्यांचा संबंधित विभागाने त्वरित पंचनामा करावा व त्वरित पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकर्यांनी व नागरिकांनी केली आहे. उमराळे बुद्रुक ते नाशिक पेठ महामार्ग लगत असलेल्या केदार वस्तीवरील शंभर फूट असलेल्या गोठ्यामध्ये दिवसा ढवळ्या सायंकाळच्या सुमारास चार वाजता बिबट्याने सहा शेळ्यांवर अचानक हल्ला केला. त्यानंतर या गोठ्याकडे पूजा कैलास केदार ह्या शेळ्यांना पाणी व चारा देण्यासाठी गेल्या असता बिबट्याने फस्त केलेल्या शेळ्या दिसताक्षणी आरडाओरोड केली. याआधीही पाच-सहा दिवसांपूर्वी या ठिकाणी बिबट्या कडून वासरू फस्त केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली. त्यामुळे केदार कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून आहे या केदार वस्तीमध्ये बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून अजून हा बिबट्या किती जनावरांचा बळी घेणार हे सांगणे मात्र कठीण आहे. त्यामुळे वन विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन या शेळ्यांचा पंचनामा करून पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील शेतकर्यांनी व नागरिकांनी केली आहे.