महाराष्ट्र ट्रायबल न्युज

धाऊर डॅम मध्ये शेतकऱ्याच्या मुलाचा पाय घसरून मृत्यू

दिंडोरी प्रतिनिधी :- दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथील डॅम मध्ये शेतकऱ्याच्या मुलाचा पाय घसरून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे भारतीय सैनिक दलात त्याची नियुक्ती पण झाली होती अशी चर्चा गावात सुरू होती .
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील धाउर येथील शेतकरी माणिक मधुकर पताडे यांचे चिरंजीव सार्थक माणिक पताडे वय 20 वर्ष हा धाऊर येथील डॅम मध्ये मोटरपंप सोडण्यासाठी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास गेला असता पाय घसरून पडल्याने सार्थक पताडे याचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सार्थक याची भारतीय सैनिक दलात नियुक्ती झाली होती व तो लवकरच भारतीय सैनिक दलात भरती होऊन देशाची सेवा करणार होता परंतु देशाची सेवा करण्या अगोदरच देवाने त्याला मृत्यूच्या ओघात लोटले आहे. सार्थक याच्या अपघाताने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाब पवार हे करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने