महाराष्ट्र ट्रायबल न्युज

अवनखेड शिवारात मानसिक आजारी तरुणाची कादवा नदीत उडी.. पाण्यात बुडून मृत्यू .

दिंडोरी l प्रतिनिधी :- नाशिक कळवण रस्त्यावर अवनखेड येथील कादवा नदीत पुलावरून एक इसमाने उडी मारत आत्महत्या केली असून सदर व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 

मयत योगेश जगन्नाथ सूर्यवंशी (वय ३५, रा. अभोना, ता. कळवण, जि. नाशिक) हा मागील काही वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होता. गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारास त्याची पत्नी व चुलत भाऊ मयूर सूर्यवंशी हे त्याला उपचारासाठी नाशिक येथे खाजगी वाहनाने घेऊन जात होते.

दरम्यान, अवणखेड शिवारातील कादवा नदीच्या पुलावर आल्यानंतर योगेशने “मला पैसे नदीत वहायचे आहेत” असे सांगत वाहन थांबविण्यास सांगितले. वाहन थांबताच त्याने अचानक दरवाजा उघडून पुलावरून खाली नदीपात्रात उडी मारली. ही घटना दुपारी सुमारे १२.१५ वाजता घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, पोलीस हवालदार कमलेश देशमुख, प्रदीप शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल अविनाश आहेर यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधकार्य हाती घेण्यात आले. अखेर दुपारी ३.२० वाजता योगेशचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

या घटनेबाबत त्याचे चुलते प्रभाकर दामोदर सूर्यवंशी (रा. अभोना) यांनी दिंडोरी पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख व पोलीस हवालदार गोतरणे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने