महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*बाऱ्हे गावात गवताची पेंडी बांधून बोहाडा (भोवाडा) उत्सवाचा प्रारंभ*

बाऱ्हे l नामदेव पाडवी:- सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे गावात सालाबादप्रमाणे यंदाही पारंपरिक उत्साहात भोवाडा (बोहाडा) उत्सवाची सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने प्रारंभी गवताची पेंडी बांधून विधिवत पूजा-अर्चा करून उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
    यावेळी गावातील युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतातून आणलेल्या कोरड्या गवताची पेंडी सर्वांनी एकत्रितपणे बांधली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पूजा करून नारळ फोडण्यात आला.
    भोवाडा उत्सव हा गावाच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असून, ग्रामस्थ एकोप्याने व उत्साहात हा सण साजरा करतात. या निमित्ताने गावात धार्मिक व आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
यासाठी बाऱ्हे परिसरातील सर्व नागरिक उपस्थित राहून भोवाड्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामस्थांनी उत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, बाऱ्हे येथील भोवाडा उत्सव दि. 21 एप्रिल 2026 ते 23 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडणार असून, या दरम्यान विविध पारंपरिक मुखवट्यांचे सादरीकरण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने