महाराष्ट्र ट्रायबल न्युज

*ठाणगाव येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल सलग दहाव्या वर्षी 100%*

बा-हे l नामदेव पाडवी:- सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम अशा ठाणगाव येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल सलग दहाव्या वर्षी 100 टक्के लागला असून विद्यालयातील कल्पना सुरेश महाले ही विद्यार्थिनी 84.40% गुणांनी प्रथम क्रमांकाने विद्यालयातून उत्तीर्ण झाली.
       जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचा मागील दहा वर्षापासून 100% टक्के निकाल लागत असून याही वर्षी यशाची परंपरा कायम राहिली आहे. विद्यालयातील एकूण 48 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून कल्पना सुरेश महाले 84.40% गुण मिळवून प्रथम, नंदिनी रामचंद्र गावित 82.40% टक्के गुण मिळवून द्वितीय, संगीता युवराज धामोडे तसेच मोनिका विलास गावित  81.20% तृतीय, भूमिका महादू गायकवाड 78.00% गुण मिळवून चतुर्थ तर नम्रता सुभाष महाले 77.00% गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
       यशस्वी विद्यार्थ्यांचे स्नेहबंधन शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीम. कलावती अक्का चव्हाण, समीर चव्हाण, मुख्याध्यापक विवेक निकम आदी मान्यवरांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने