दिंडोरी । मनोज पाटील :- आपल्याला जीवनाच्या वाटचालीत अनेकांनी सहकार्य केले. आजही आपण दिलेल्या आव्हानाला कार्यकर्ते टाईम प्रतिसाद देतात, यापुढेही आपण दिंडोरी - पेठ तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी झटत राहू, असे प्रतिपादन दिंडोरी - पेठ विधानसभा मतदार संंघाचे माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते धनराज महाले यांनी केले.
वारे येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने माजी आमदार धनराज महाले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी महाले बोलत होते. धनराज महाले यांनी सांगितले की, आपल्याला आतापर्यंत सर्व पक्षांची साथ मिळाली. अनेक कार्यकर्ते आपल्याला जोडले गेले. जनतेच्या विकासाचा वासा आजही आपण सुरू ठेवलेला आहे. जनतेचे शिक्षण आरोग्य दळणवळण आदी प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही धनराज महाले म्हणाले. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुनील पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे, शिवसेनेचे नेते प्रवीण जाधव आदींनी महाले यांना शुभेच्छा दिल्या. दिवसभरात अनेक मान्यवरांनी धनराज महाले यांना प्रत्यक्ष भेटून सत्कार केला व वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. धनराज महाले यांना शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, माजी मंत्री डॉ. भारती पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकूळ झिरवाळ, युवा सेना जिल्हाप्रमुख वैभव महाले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल कदम, बाळासाहेब मुरकूटे, गणपत जाधव, विधानसभाप्रमुख अतुल वाघ, दिंडोरीच्या नगराध्यक्ष सुनिता लहांगे, नगरसेवक नितीन गांगुर्डे, सुजित मुरकुटे, हेमंत पगारे, नंदू बोंबले, नरेंद्र जाधव, सोमनाथ जाधव, डॉ. विलास देशमुख, संतोष मुरकुटे, राहुल कावळे, नितीन भालेराव, नितीन देशमुख, अनिल आव्हाड, अनिल चौगुले, किरण देशमुख, सुरेश देशमुख, शिवाजी पिंगळे, चंद्रकांत राजे, विलास देशमुख, प्रशांत कड, योगेश बर्डे, परीक्षेत देशमुख, प्रतीक जाधव, नामदेव गावित, नाना मोरे, शिवसागर पवार, तुषार गांगुर्डे ,मनोज पाटील पत्रकार, कृष्णा पवार पत्रकार कैलास वसावे आदींसह दिंडोरी - पेठ विधानसभा मतदार संघाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार धनराज महाले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.